रविवार, ७ डिसेंबर, २००८

चंद्र अन् ती..

ती.. नेहमी प्रमाणे चंद्र शोधत होती... बर्‍याच दिवसात तिच्या त्याच्या काहीच गप्पा झाल्या नाही.. पण चंद्र आज सापडतच नव्हता.. चांदण्या लुकलुकत हसत होत्या.. तिने त्यांना विचारल, '' तुम्हाला माहित आहे का गं कुठेय चंद्र?'' .. लुकलुकण्याशिवाय काहिच उत्तर नव्हत ना कधी तिला मिळाल.. चंद्रही असाच.. गप्प गप्प.. पण ती नेहमीच त्याच्याशी बोलत राहायची... आज ती चांदण्यांचा गुंता सोडवत बसली.. चंद्र येतच नव्हता.. अस करता करता किती अंर्तमुख होत होती ती.. आज तिला चंद्रा जवळ रडायच होत.. एकटेपणावर त्याच्या सोबत हसायच होत.. ''किती वेडी ना मी.. तू असताना एकट वाटतच कस मला?'' अस म्हणायच होत.. नंतर त्याच्या गप्प बसण्याबद्दल खूप खूप भांडायच होत... तिच आणि चंद्राच नातच अजब.. मुळात तिच अजब... नात्याच्या बाबतीत हळवी.. मनापासून कुठल्याही नात्यावर प्रेम करणारी.. पण का कुणास ठाऊक शेवटी परत एकटीच उरणारी.. एकटी छे... चंद्र आहे की तिच्या सोबतीला.. पण हट्ट सोबतीचा का असतो? आज तिलाही तोच प्रश्न पडला होता.. आज तिला चंद्राशी भांडायच होत.. ''तु का नाही रे बोलत?'' ती थकली होती एकटच बोलून... तिची नजर क्षितिजांपल्याड पोहचत नव्हती.. आणि चंद्र आज लपुन बसला होता.. पाणवलेल्या डोळ्यांनी आता चांदण्याही पुसटश्या दिसु लागल्या.. पण चंद्र.. नजरे आड बहुदा त्याला माहीत असावं आज ही भांडणार.. ती तशीच एकटी.. चंद्राची वाट बघत बसली.. आज तिला चंद्रही परका वाटला.. त्या चांदण्याचाच चंद्र होता तो बहुदा.. ती अजूनच एकटी पडली.. रत्र अशीच सरली.. दुसरा दिवसही.. आज तिने ठरवल की आपण चंद्रा कडे बघायच देखिल नाही.. पण सवयीने नजर वर गेलीच.. आज तो तिच्या कडे बघुन हसत होता.. एकच कोर नाजुकषी.. तिच्या द्यानात आल अरे काल तर आमवस्या होती.. सगळे भावना कल्लोळ विसरुन परत चंद्रशी गुजगोष्टी सुरु झाल्या तिच्या... आज त्या वेडिला तो बोलत नाही ह्याचीही तमा नव्हती.. त्याच अस्तिवच सुखवणार होत तिच्यासाठी... (न राहवून टाकलेली पोस्ट.. )

रविवार, २३ नोव्हेंबर, २००८

एक जादुगार आणि आधा चाँद..

विचित्र अनुभव अनुभवतेय... पण त्यात जगतेय... कोणीतरी आहे.. की त्या कोणीतरीची नुसती आठवण आली तरी चेहर्‍यावर हसु उमटतं .. खर तर त्या कोणीतरीशी माझी ओळख नाही. आणि ना मी त्या कोणीच्या प्रेमात बिमात आहे तरीही.. आमच्या दोघात कुठलच नात नाही तरीही... एक अनामिक शक्ती आहे... मला नं तो जादुगारच वाटतो.. कारण.. तेही नेमक्या शब्दात नाही सांगु शकत... पण आहे ते छान आहे.. पुढे काय होणार याचा काहीच अंदाज नाही.. हम्म्म.. असो पुढचा विचार करण्यात मला आज घालवायचा नाही.. तस विचार करण्यासारखही काहीच नाही... म्हणून आज जगण्याचा प्रयत्न...तोही क्षणीक कारण तो पुर्ण वेळ नसतो बरोबर...तरीही... :) पुरे चाँद की उम्मीद सभी को है। पर आधा चाँद भी काफ़ी खुबसुरत होता है... ( हम तो शायराना हो गए :)) ही पोस्ट संपवतानाही एक मोठा श्वास आणि हसु हिच प्रतिक्रिया आहे... खरचं तो जादुगारच आहे... :) (या नंतर एक विश्रांती घेतेय.. बरेच जण नव्या पोस्ट बद्दल विचारत होते.. म्हणुन ही.. आता अभ्यास सुरु आहे... नो ब्लॉगींग... आता भेटुया पुढल्या वर्षी.. २००९.. तब तक सायोनारा)

सोमवार, २२ सप्टेंबर, २००८

...

ए कशी आहेस गं? कुणास ठाऊक कशी ते? हम्म थोडी वेगळी वाटते आहेस? वेगळी? नक्की कशी? नेमकं नाही सांगता येत.. पण वेगळीचं जाणवतय.. पण या वेळेस शोध नकोय.. चक्क तुला शोध नको??? आहो आश्चर्यम म्हणायचं? ह्म्म चक्क मला शोध नकोय नाही शिरायचय खोलात.. बर्‍याचदा मी खोलात शिरते.. आतुन नक्की काय आहे हे शोधायच्या नादात भरकटत जाते.. तेही हवहवस वाटतच पण आज मला काठावरच बसायचय.. हिरवी झाड.. अलगद वारा.. आकाशात उडणारी पाखर क्षितिज्या पल्याड जाईपर्यंत पहात राहयचयं .. मला मोकळा श्वास घेउन सार सार अनुभवायचयं.. मला असही एकदा जगायचयं तुम्हा इतरांसारखचं...

गुरुवार, २१ ऑगस्ट, २००८

निरोप... ?????

निरोप! मी कविता करते हे शाळेत कोणाला महित नव्हते आणि अचानक १०वीच्या सेन्डॉफला मी कविता वाचली होती निरोप... मला आठवतय सगळ्यांनी भरभरुन कौतुक केल होत काहींचे तर चक्क डोळे भरुन आले. त्यावर्षी शाळेने मला बक्षिस झाहीर केलं... मल हे सगळ नको होत.. पण परत त्याच शाळेत ११विसाठी प्रवेश घेतल ११वि १२वी परत निरोप... या वेळी भाषणही होत निरोपाच स्टेजवर उभी राहिले.. हात थरथरत होते निरोप शब्दात मांडण खुप आवघड असत ना? तो मी मांडण्याचा प्रयत्न करत होते... डोळ्यातुन आश्रु ओघळत होते माझ्याही नकळत.. मद्येच मी गप्प झाले शब्द फुटेनात एरवी अशा परिस्थितीत गोंधळ घालणार्‍या मुलीही शांत होत्या त्या वेळेस मी अर्धवट भाषण सोडुन निघाले कोणीतरि मला परत माईक पुढे ढकलल.. मी परत बोलले.. काय ते नक्कि आठवत नाही... भाषणाची प्रत बहुतेक सापडेल घरी.. संपल भाषण..सगळ निःशब्द होत... नंतर सगळ्याचे हुंदके ऐकु आले.. या वेळेस टाळ्या खूप उशीरा पडल्या.. खाली उतरले तेव्हा... पण आता त्या गोष्टी आठवल्या की आता एक वेगळच फिलींग येत.. मी किती लकी होते.. मझ्याकडे निरोप द्यायला माणसं होती... आता जेव्हा पुण्याहुन निघते तेव्हाप्रत्येक वेळेस जाणवत निरोप द्यायला अश्रु लपवत कोणी समोर उभ नसतं... मायेने बनवलेले पदार्थ.. अपुलकी आनि काळजीने आणलेल्या वस्तु.. पोटतिडकीने काळजी घे गं म्हणणार कोणीच उरलेल नाही... खिडकीतुन बाहेर नजर जाते ती फक्त शुन्यात.. (सॅम आणि जॅस चे निरोपा संर्धभातील पोस्ट वाचुन माहित नाही का, पण मोकळ व्हावसं वाटल)

सोमवार, २१ जुलै, २००८

एक स्वप्न

देव कधी कधी खुप परिक्षा घेतो नाही?एका हाताने आनंद देतो.. आपण त्यात जगायला लागलो की तो आनंद निसटुन जातो.. मी प्रत्येक वेळी मनाला समजावते.. याच्यातही काही चांगल दडल आहे.. कोणास ठाऊक पुढे याहुन चांगल वाढल आहे.. मनही ऐकत माझ.. अश्या वेळी हट्टीपणा सोडुन शहाण्या मुलासारख वागत..आता मी आणी माझ मन वाट बघतोय.. काहीतरी चांगल होण्याची.. यावेळेस हातातुन काही निसटायला नकोय.. या वेळेस एक स्वप्न पुर्ण होणार आहे कदाचित.. कदाचित नाही नक्की.. हे खुप स्पेशल आहे कारण ते मी माझ्यासाठी बघितलेल आहेच पण माझ्यासाठी आणी कोणीतरी बघितलेल अस एकमेव स्वप्न आहे.. प्रयत्न चालु आहे.. जे निसटुन गेल ते याच करिता असाव ...

सोमवार, १४ जुलै, २००८

एक गोड आठवण

अशीच एक आठवण... माझी अन् माझ्या बाबांची आठवण... आम्ही अस्वाद मध्ये गेलो होतो (दादरच हॉटेल).. बाबांन पियुश प्यायच होत... मी विचारल (बाबांसमोर माझ्या मेंदुच वय खरोखरच कमी व्ह्यायच बहुतेक) मी : बाबा.. पियुष नेमक कशापासुन बनवितात? बाबा: अग श्रिखंडाच रिकाम पातेल असत ना? त्याला थोड श्रिखंड उरलेल असत.. ते पावसाच्या पाण्यत ठेवायच... उरत ते पियुष.. मी : (मुर्खा सारखी) पण यांना दरवेळेस कस काय पावसाच पाणी मिळत? बाबा : अगं (इथे मी एकदम सिरियसली ऐकत होते) ते काय करतात माहितेय? श्रिखंडाच भांड नळा खाली ठेवतात... आणि नळा खाली चाळणी धरतात.. झाल...(एक कटाक्ष टाकुन...) डम्बो. मी: ....... :) खरच काही गोड आठवणी हसवत हसवत डोळ्यांच्या कडा नकळत भिजवतात ना?

मंगळवार, ८ जुलै, २००८

:)

लाड...लाड कोणाला नाही आवडत... तस म्हणायला गेल तर मी तर मस्त लाडात वाढली आहे... पण आता लाड आणी मनाचे हट्ट पुरवायला कोणीच नाही :( नो वरीज... मी आहे ना खुद्द मी... स्वतःचे लाड स्वतः पुरवायला... मनाचे हट्ट स्वतःच ऐकुन घ्यायचे.. मनाला काय हवय काय नको सगळ स्वतःलाच सांगायच... ऐकायला विचीत्र वाटतय ना... पण मी खुप एन्जॉय करतेय...मला ना एकदम माझी मीच आई झाल्या सारख वाटतय... लाड पुरवणारी.. हट्ट ऐकणारी.. मनाला धाक धाकवणारी माझी मीच आई... :)सॉली SSSS ड आईडिया ना.... :)ही पिटुकली पोस्ट पण लाडच आहेत माझेच मी पुरवलेले..

सोमवार, ३० जून, २००८

सध्या नविन गोष्टीची ओळख झाली आहे... गोष्ट म्हणजे एक नवा अनुभव.. ऐकायला वाचायला नवा नसेल कदाचित पण कधी कोणी अश्या अनुभवातुन जाऊ नये अस वाटतय... एकटे पणा आम्ही मस्त उपभोगु शकतो आनंदाने.. नविन जगण्याचा प्रयत्न करत.. कधी थकतोही थांबतो.. परत त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो... हे चक्र चालु राहतच.. कारण आयुष्यात निराळ अस काही घडत नव्हतं... पण मागच्या आठवड्यात अचानक एक चान्गली बातमी कानावर आली आणि तिही माझ्या बाबतीत.. आमची बढती झाल्याच कळल.. आनंद झाला खूप... काम सुरु झाल तेव्हाचा आनंद तर झुप समाधान मिळाल... वाटल हे सगळ आपल्या कोणाला तरी सांगाव .. ऐइची आठवण आली.. पण तिथ पर्यत फोनही पोहचत नाही... पण तरी तिच्या पर्यत ही गोष्ट पोहचली असावी... पण हात आपसुक मोबाईल कडे वळला.. त्यांना फोन करावा नाही नको समस पाठवावा.. हो नाही म्हणता म्हणता smsपाठवला काही उत्तर नव्हत.. आता या वेळेस खुप गरज होती त्यांच्या नुसत्या उत्तराची नव्हे तर त्यांच्या सोबतीची.. दुसर्‍यादिवशी उत्तर मिळाल.. त्यांनाही खुप आनंद झाला होता म्हणे.. पण .. असो त्यातच समाधान वाटुन घ्याव नाही का? माणसाच दुःख sमस करायला कोणी असो वा नसो निदान सुखात तरी कोणीतरी असावच नाहितर त्याहुन दुःख कोणतच नाही..असो निदान मी तरी याच्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतेय.. आणी गाण गुणगुणतेय '' हर पल यहॉ जी भर जियो.. जो है समा कल हो ना हो''

सोमवार, ९ जून, २००८

कोरडा पाऊस...

बाहेर पाऊस पडतोय... पण हा पावसाळा नविन आहे... बिन्धास्त भिरभिर करणार आणी मनोसोक्त पावसात भिजणार माझ मन आताशा पावसाने आनंदुन जात पण इतक नाही... नाहितर पाऊस आणी मी.. कुठल्याच पावसाचा कंटाळा यायचा नाही मला पहिल्या पवसा इतकाच आनंद प्रत्येक पावसात असायचा... पण आजचा.. पाऊस ओळखिचा आणी आपलासा वाटत नाही.. आधी पावसात भिजताना माझ्यातल्या मलाच मी भेटतेय अस वाटायच पण आता...?? कोणास ठाऊक काय बादललय ते? इतरांच्या मते हा फक्त माझ्या मनाचा खेळ... पण.. असो...आता पावसात भिजते.. पण मला मी नाही भेटत भिजताना... आनंद मिळतो नाही अस नाही.. पण चिरंतर नसतो तो... मी मझ्या पावसाला शोधतेय.. ह्या पावसाच स्वागत करता करता.. कोणास ठाऊक हा पाऊस भिजवत असुनही कोरडाच भासतो..

मंगळवार, २२ एप्रिल, २००८

आठवण छळते...मग कुणाचीही असो...कुणाचीही? कुणाचीही...कुणा आपल्या म्हणविणार्‍या म्हणणार्‍या कुणाचीही.... कधीतरी गुलजारजींच्या ओळी आठवतात... तेरे उतारे हुवे दिन टंगे है लॉन में अब तक.... वा क्या बात है.... गुलजारजी त्या आठवणींना सुंदर करतात आणी तरी घायाळ...पण इतक कोण का आठवाव? त्या मुळे त्रास होतोय फ्क्त...ती तशीच जास्त आठवतेय... आणी ती आठवण आतुन मला जाळतेय... तिचा तो काही तासांचा अस्वस्थपणा गेल वर्षभर मला अस्वस्थ करतोय... ती शांत निजली पण मी अजुनही रात्री जागवतेय... जाग..याला नेमक जागही म्हणता येत नाही... http://www.youtube.com/watch?v=j-ltEkrbDN4&eurl=http://www.orkut.com/FavoriteVideos.aspx?uid=8779623298749326985 एक रानफुल

गुरुवार, १७ एप्रिल, २००८

असंबध..पण...

माझ्या आयुष्यातली काही फुल... काही मोगरा जाई जुई जास्वंद चाफा कमळं गुलाब तशीच नाती आई॥भाऊ बहिण.. मावश्या मामा..मित्र मैत्रिणी.. फुलच नव्हे का ही? या फुलांना नाव आहे इतकच... कोण देत हो ही नाव? समाज..? रुढींनी चालत आलेलि ही नात्यांची नाव... पण शब्दांच्या कुठल्याच कोशात न बसणार नात त्याला काय म्हणायच? का तेही रानफुला सारखच?मी अश्याच एका नात्याला नाव दिलं... पण लोकांना ते नातच समजत नाही.. समजावा हा हट्टही नसतोच पण.. त्या नात्याला दुसर्‍या कुठल्याच नात्याने संबोधल्याच खपत मात्र नाही... का आपण फ़्रेम करुन ठेवली आहे प्रत्येक गोष्ट? कुठल्याही सीमा न ओलांडता क्षितिजा बाहेर वाहणार्‍या नद्या या निर्मळच ना? मग भावनांना का अशी कड्या कुलप लावल्या सारख डांबुन ठेवायच? हं अस नसतच कदाचित... इथे आहेत ती नाती निभावता येत नाहीत... डोळ्या समोरची नाती दिसत नाहीत.. यांची नजर क्षितिजा पल्याड कुठुन जाणार? पण मग ज्यांच्या जातात त्यांना अस बोचर्‍या नजरांनी आणी शब्दांनी का ओरबाडुन काढायचं? जगु द्या त्या रानफुलाला टिच भर मातीत उगवत ते बिचारं...वाहु दे की त्या नदीला स्वछंदी पणे... क्षितिजापल्याड... कुणास ठाऊक जगण्याचा अर्थ याच्यातच दडलेला असावा... मी एक रानफुल..

गुरुवार, १० एप्रिल, २००८

मी कोण????

इथे मी मला हवं ते लिहण्याचा प्रयत्न करणार आहे... मनात येईल तो विचार मांडणार आहे... घाबरु नका मी विचार असेच करते जे बोलुन दाखवता येतील.. :) आपण जगताना गुलाब किंवा कमळ व्हायच्या उद्दिष्टाने जगतो... झालच तर मोगरा किंवा इतर सुगंधी फ़ुल म्हणुन... पण कोणाच्या मनात रानफ़ुल होण्याचा विचार काधी येतच नसावा ना? ... मीही गुलाब होण्याची स्वप्न बघतेच की...पण खुपदा रानफ़ुलही व्हावसं वाटत... या रानफ़ुलाचा इथे हा छोटासा प्रयत्न.. स्वत:ची ओळख पटवुन द्यायचा... एक रानफ़ुल... म्हणुनच ...
रानफ़ुल