रविवार, ७ डिसेंबर, २००८

चंद्र अन् ती..

ती.. नेहमी प्रमाणे चंद्र शोधत होती... बर्‍याच दिवसात तिच्या त्याच्या काहीच गप्पा झाल्या नाही.. पण चंद्र आज सापडतच नव्हता.. चांदण्या लुकलुकत हसत होत्या.. तिने त्यांना विचारल, '' तुम्हाला माहित आहे का गं कुठेय चंद्र?'' .. लुकलुकण्याशिवाय काहिच उत्तर नव्हत ना कधी तिला मिळाल.. चंद्रही असाच.. गप्प गप्प.. पण ती नेहमीच त्याच्याशी बोलत राहायची... आज ती चांदण्यांचा गुंता सोडवत बसली.. चंद्र येतच नव्हता.. अस करता करता किती अंर्तमुख होत होती ती.. आज तिला चंद्रा जवळ रडायच होत.. एकटेपणावर त्याच्या सोबत हसायच होत.. ''किती वेडी ना मी.. तू असताना एकट वाटतच कस मला?'' अस म्हणायच होत.. नंतर त्याच्या गप्प बसण्याबद्दल खूप खूप भांडायच होत... तिच आणि चंद्राच नातच अजब.. मुळात तिच अजब... नात्याच्या बाबतीत हळवी.. मनापासून कुठल्याही नात्यावर प्रेम करणारी.. पण का कुणास ठाऊक शेवटी परत एकटीच उरणारी.. एकटी छे... चंद्र आहे की तिच्या सोबतीला.. पण हट्ट सोबतीचा का असतो? आज तिलाही तोच प्रश्न पडला होता.. आज तिला चंद्राशी भांडायच होत.. ''तु का नाही रे बोलत?'' ती थकली होती एकटच बोलून... तिची नजर क्षितिजांपल्याड पोहचत नव्हती.. आणि चंद्र आज लपुन बसला होता.. पाणवलेल्या डोळ्यांनी आता चांदण्याही पुसटश्या दिसु लागल्या.. पण चंद्र.. नजरे आड बहुदा त्याला माहीत असावं आज ही भांडणार.. ती तशीच एकटी.. चंद्राची वाट बघत बसली.. आज तिला चंद्रही परका वाटला.. त्या चांदण्याचाच चंद्र होता तो बहुदा.. ती अजूनच एकटी पडली.. रत्र अशीच सरली.. दुसरा दिवसही.. आज तिने ठरवल की आपण चंद्रा कडे बघायच देखिल नाही.. पण सवयीने नजर वर गेलीच.. आज तो तिच्या कडे बघुन हसत होता.. एकच कोर नाजुकषी.. तिच्या द्यानात आल अरे काल तर आमवस्या होती.. सगळे भावना कल्लोळ विसरुन परत चंद्रशी गुजगोष्टी सुरु झाल्या तिच्या... आज त्या वेडिला तो बोलत नाही ह्याचीही तमा नव्हती.. त्याच अस्तिवच सुखवणार होत तिच्यासाठी... (न राहवून टाकलेली पोस्ट.. )

२ टिप्पण्या:

यशोधरा म्हणाले...

काय, अभ्यासात लक्ष दिसत नाहीय्ये??? :D
का संपली परीक्षा वगैरे? त्यासाठीच अभ्यास करत असशील असा समज माझा आपला. मी फक्त परीक्षेच्या आसपासच पुस्तकांना हात लावत असे, त्यामुळे जनरली सगळे तसच करत असावेत असा माझा आपला एक समज... :D

ब्लॉगिंगसाठी शुभेच्छा... :)

Sneha म्हणाले...

aga pariksha sampali vaigere nahi .. pan asach suchal .. ani velahi milala 4 a change :P