मंगळवार, २२ एप्रिल, २००८

आठवण छळते...मग कुणाचीही असो...कुणाचीही? कुणाचीही...कुणा आपल्या म्हणविणार्‍या म्हणणार्‍या कुणाचीही.... कधीतरी गुलजारजींच्या ओळी आठवतात... तेरे उतारे हुवे दिन टंगे है लॉन में अब तक.... वा क्या बात है.... गुलजारजी त्या आठवणींना सुंदर करतात आणी तरी घायाळ...पण इतक कोण का आठवाव? त्या मुळे त्रास होतोय फ्क्त...ती तशीच जास्त आठवतेय... आणी ती आठवण आतुन मला जाळतेय... तिचा तो काही तासांचा अस्वस्थपणा गेल वर्षभर मला अस्वस्थ करतोय... ती शांत निजली पण मी अजुनही रात्री जागवतेय... जाग..याला नेमक जागही म्हणता येत नाही... http://www.youtube.com/watch?v=j-ltEkrbDN4&eurl=http://www.orkut.com/FavoriteVideos.aspx?uid=8779623298749326985 एक रानफुल

गुरुवार, १७ एप्रिल, २००८

असंबध..पण...

माझ्या आयुष्यातली काही फुल... काही मोगरा जाई जुई जास्वंद चाफा कमळं गुलाब तशीच नाती आई॥भाऊ बहिण.. मावश्या मामा..मित्र मैत्रिणी.. फुलच नव्हे का ही? या फुलांना नाव आहे इतकच... कोण देत हो ही नाव? समाज..? रुढींनी चालत आलेलि ही नात्यांची नाव... पण शब्दांच्या कुठल्याच कोशात न बसणार नात त्याला काय म्हणायच? का तेही रानफुला सारखच?मी अश्याच एका नात्याला नाव दिलं... पण लोकांना ते नातच समजत नाही.. समजावा हा हट्टही नसतोच पण.. त्या नात्याला दुसर्‍या कुठल्याच नात्याने संबोधल्याच खपत मात्र नाही... का आपण फ़्रेम करुन ठेवली आहे प्रत्येक गोष्ट? कुठल्याही सीमा न ओलांडता क्षितिजा बाहेर वाहणार्‍या नद्या या निर्मळच ना? मग भावनांना का अशी कड्या कुलप लावल्या सारख डांबुन ठेवायच? हं अस नसतच कदाचित... इथे आहेत ती नाती निभावता येत नाहीत... डोळ्या समोरची नाती दिसत नाहीत.. यांची नजर क्षितिजा पल्याड कुठुन जाणार? पण मग ज्यांच्या जातात त्यांना अस बोचर्‍या नजरांनी आणी शब्दांनी का ओरबाडुन काढायचं? जगु द्या त्या रानफुलाला टिच भर मातीत उगवत ते बिचारं...वाहु दे की त्या नदीला स्वछंदी पणे... क्षितिजापल्याड... कुणास ठाऊक जगण्याचा अर्थ याच्यातच दडलेला असावा... मी एक रानफुल..

गुरुवार, १० एप्रिल, २००८

मी कोण????

इथे मी मला हवं ते लिहण्याचा प्रयत्न करणार आहे... मनात येईल तो विचार मांडणार आहे... घाबरु नका मी विचार असेच करते जे बोलुन दाखवता येतील.. :) आपण जगताना गुलाब किंवा कमळ व्हायच्या उद्दिष्टाने जगतो... झालच तर मोगरा किंवा इतर सुगंधी फ़ुल म्हणुन... पण कोणाच्या मनात रानफ़ुल होण्याचा विचार काधी येतच नसावा ना? ... मीही गुलाब होण्याची स्वप्न बघतेच की...पण खुपदा रानफ़ुलही व्हावसं वाटत... या रानफ़ुलाचा इथे हा छोटासा प्रयत्न.. स्वत:ची ओळख पटवुन द्यायचा... एक रानफ़ुल... म्हणुनच ...
रानफ़ुल