गुरुवार, १७ एप्रिल, २००८

असंबध..पण...

माझ्या आयुष्यातली काही फुल... काही मोगरा जाई जुई जास्वंद चाफा कमळं गुलाब तशीच नाती आई॥भाऊ बहिण.. मावश्या मामा..मित्र मैत्रिणी.. फुलच नव्हे का ही? या फुलांना नाव आहे इतकच... कोण देत हो ही नाव? समाज..? रुढींनी चालत आलेलि ही नात्यांची नाव... पण शब्दांच्या कुठल्याच कोशात न बसणार नात त्याला काय म्हणायच? का तेही रानफुला सारखच?मी अश्याच एका नात्याला नाव दिलं... पण लोकांना ते नातच समजत नाही.. समजावा हा हट्टही नसतोच पण.. त्या नात्याला दुसर्‍या कुठल्याच नात्याने संबोधल्याच खपत मात्र नाही... का आपण फ़्रेम करुन ठेवली आहे प्रत्येक गोष्ट? कुठल्याही सीमा न ओलांडता क्षितिजा बाहेर वाहणार्‍या नद्या या निर्मळच ना? मग भावनांना का अशी कड्या कुलप लावल्या सारख डांबुन ठेवायच? हं अस नसतच कदाचित... इथे आहेत ती नाती निभावता येत नाहीत... डोळ्या समोरची नाती दिसत नाहीत.. यांची नजर क्षितिजा पल्याड कुठुन जाणार? पण मग ज्यांच्या जातात त्यांना अस बोचर्‍या नजरांनी आणी शब्दांनी का ओरबाडुन काढायचं? जगु द्या त्या रानफुलाला टिच भर मातीत उगवत ते बिचारं...वाहु दे की त्या नदीला स्वछंदी पणे... क्षितिजापल्याड... कुणास ठाऊक जगण्याचा अर्थ याच्यातच दडलेला असावा... मी एक रानफुल..

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Nati ani phool !!!
Prateyk natylaa naav aste tasech pholllaa pan…
Kharech sunder …
lihiles bagh….asech lihit raha