सोमवार, २२ सप्टेंबर, २००८

...

ए कशी आहेस गं? कुणास ठाऊक कशी ते? हम्म थोडी वेगळी वाटते आहेस? वेगळी? नक्की कशी? नेमकं नाही सांगता येत.. पण वेगळीचं जाणवतय.. पण या वेळेस शोध नकोय.. चक्क तुला शोध नको??? आहो आश्चर्यम म्हणायचं? ह्म्म चक्क मला शोध नकोय नाही शिरायचय खोलात.. बर्‍याचदा मी खोलात शिरते.. आतुन नक्की काय आहे हे शोधायच्या नादात भरकटत जाते.. तेही हवहवस वाटतच पण आज मला काठावरच बसायचय.. हिरवी झाड.. अलगद वारा.. आकाशात उडणारी पाखर क्षितिज्या पल्याड जाईपर्यंत पहात राहयचयं .. मला मोकळा श्वास घेउन सार सार अनुभवायचयं.. मला असही एकदा जगायचयं तुम्हा इतरांसारखचं...

1 टिप्पणी:

veerendra म्हणाले...

रानफुला !
मी तुझा ब्लॉग माझ्या या पोस्टमधे जोडला आहे. "ब्लॉग" या विषयावर मी एक पोस्ट लिहीली आहे. तरी एकदा नजर टाकावी.

शुभेच्छा !