मंगळवार, २८ एप्रिल, २००९

फुल....... ईमोशनलफुल

तू ना ईमोशनलफुल आहेस... कधितरी डोक्याने विचार कर.. बी प्रॅक्टिकल ... अत्ता पर्यंत तू शिकायला हव होतस.... ही वाक्य इतक्यांदा ऐकली आहेत ना.. की आता डोक्यात जातात... हो आहे मी एमोशनलफुल.. प्रत्येक क्षण जगते मी .. मग तो चांगला असो वा कसाही... त्या प्रत्येक क्षणाचे माझ्यावर परिणाम होतात.. आहो पण मि जगते हो ते क्षण... खर तर मला नव्याने उमगलय.. मीच प्रॅक्टीकल आहे.. येणारे प्रत्येक क्षण जगते.. पचवते.. कधि रडते.. हसते.. पण आहे ती परिस्थिती मी स्वीकारते.. न रडता... कुठलीही कुरबुर न करता... सुधरण्याचा प्रयत्न्ही नक्किच करते... पण कानाडोळा नाही करु शकत म्हणजे मी प्रॅक्टिकल नाही? मला नाही चौकट घालता येत मना वर.. अस वागायच.. वैगेरे... दिसताना हळवी दिसनारी मी जगताना आणि कुठलेही निर्णय घेताना नक्कीच प्रॅक्टिकल असते.. आणि जगते... आणि मला असच रहयचय... कुठलेही हिशोब न मांडता.. सोयीचे पळपुटे मार्ग न काढता.. येईल तो क्षण जगत... मग मला इमोशनलफुल म्हणा नही तर कहीही... कुछ फ़र्क नही पैदा...... मी अशीच रहणार....