सोमवार, ९ जून, २००८

कोरडा पाऊस...

बाहेर पाऊस पडतोय... पण हा पावसाळा नविन आहे... बिन्धास्त भिरभिर करणार आणी मनोसोक्त पावसात भिजणार माझ मन आताशा पावसाने आनंदुन जात पण इतक नाही... नाहितर पाऊस आणी मी.. कुठल्याच पावसाचा कंटाळा यायचा नाही मला पहिल्या पवसा इतकाच आनंद प्रत्येक पावसात असायचा... पण आजचा.. पाऊस ओळखिचा आणी आपलासा वाटत नाही.. आधी पावसात भिजताना माझ्यातल्या मलाच मी भेटतेय अस वाटायच पण आता...?? कोणास ठाऊक काय बादललय ते? इतरांच्या मते हा फक्त माझ्या मनाचा खेळ... पण.. असो...आता पावसात भिजते.. पण मला मी नाही भेटत भिजताना... आनंद मिळतो नाही अस नाही.. पण चिरंतर नसतो तो... मी मझ्या पावसाला शोधतेय.. ह्या पावसाच स्वागत करता करता.. कोणास ठाऊक हा पाऊस भिजवत असुनही कोरडाच भासतो..

1 टिप्पणी:

सुनिल सावंत म्हणाले...

अग पाऊस हा पाऊस असतो... माझा पाऊस, तुझा पाऊस वेगळा नसतो. तो येतो, आणि चिम्ब भिजवून टाकतो. मना वरचा रेन कोट काढुन टाकुन मग पावसात भिज आणि पहा तर कोरड वाटते कि चिम्ब भिजते.... जस्ट एन्जॉय द रेन....