सोमवार, २१ जुलै, २००८

एक स्वप्न

देव कधी कधी खुप परिक्षा घेतो नाही?एका हाताने आनंद देतो.. आपण त्यात जगायला लागलो की तो आनंद निसटुन जातो.. मी प्रत्येक वेळी मनाला समजावते.. याच्यातही काही चांगल दडल आहे.. कोणास ठाऊक पुढे याहुन चांगल वाढल आहे.. मनही ऐकत माझ.. अश्या वेळी हट्टीपणा सोडुन शहाण्या मुलासारख वागत..आता मी आणी माझ मन वाट बघतोय.. काहीतरी चांगल होण्याची.. यावेळेस हातातुन काही निसटायला नकोय.. या वेळेस एक स्वप्न पुर्ण होणार आहे कदाचित.. कदाचित नाही नक्की.. हे खुप स्पेशल आहे कारण ते मी माझ्यासाठी बघितलेल आहेच पण माझ्यासाठी आणी कोणीतरी बघितलेल अस एकमेव स्वप्न आहे.. प्रयत्न चालु आहे.. जे निसटुन गेल ते याच करिता असाव ...

सोमवार, १४ जुलै, २००८

एक गोड आठवण

अशीच एक आठवण... माझी अन् माझ्या बाबांची आठवण... आम्ही अस्वाद मध्ये गेलो होतो (दादरच हॉटेल).. बाबांन पियुश प्यायच होत... मी विचारल (बाबांसमोर माझ्या मेंदुच वय खरोखरच कमी व्ह्यायच बहुतेक) मी : बाबा.. पियुष नेमक कशापासुन बनवितात? बाबा: अग श्रिखंडाच रिकाम पातेल असत ना? त्याला थोड श्रिखंड उरलेल असत.. ते पावसाच्या पाण्यत ठेवायच... उरत ते पियुष.. मी : (मुर्खा सारखी) पण यांना दरवेळेस कस काय पावसाच पाणी मिळत? बाबा : अगं (इथे मी एकदम सिरियसली ऐकत होते) ते काय करतात माहितेय? श्रिखंडाच भांड नळा खाली ठेवतात... आणि नळा खाली चाळणी धरतात.. झाल...(एक कटाक्ष टाकुन...) डम्बो. मी: ....... :) खरच काही गोड आठवणी हसवत हसवत डोळ्यांच्या कडा नकळत भिजवतात ना?

मंगळवार, ८ जुलै, २००८

:)

लाड...लाड कोणाला नाही आवडत... तस म्हणायला गेल तर मी तर मस्त लाडात वाढली आहे... पण आता लाड आणी मनाचे हट्ट पुरवायला कोणीच नाही :( नो वरीज... मी आहे ना खुद्द मी... स्वतःचे लाड स्वतः पुरवायला... मनाचे हट्ट स्वतःच ऐकुन घ्यायचे.. मनाला काय हवय काय नको सगळ स्वतःलाच सांगायच... ऐकायला विचीत्र वाटतय ना... पण मी खुप एन्जॉय करतेय...मला ना एकदम माझी मीच आई झाल्या सारख वाटतय... लाड पुरवणारी.. हट्ट ऐकणारी.. मनाला धाक धाकवणारी माझी मीच आई... :)सॉली SSSS ड आईडिया ना.... :)ही पिटुकली पोस्ट पण लाडच आहेत माझेच मी पुरवलेले..

सोमवार, ३० जून, २००८

सध्या नविन गोष्टीची ओळख झाली आहे... गोष्ट म्हणजे एक नवा अनुभव.. ऐकायला वाचायला नवा नसेल कदाचित पण कधी कोणी अश्या अनुभवातुन जाऊ नये अस वाटतय... एकटे पणा आम्ही मस्त उपभोगु शकतो आनंदाने.. नविन जगण्याचा प्रयत्न करत.. कधी थकतोही थांबतो.. परत त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो... हे चक्र चालु राहतच.. कारण आयुष्यात निराळ अस काही घडत नव्हतं... पण मागच्या आठवड्यात अचानक एक चान्गली बातमी कानावर आली आणि तिही माझ्या बाबतीत.. आमची बढती झाल्याच कळल.. आनंद झाला खूप... काम सुरु झाल तेव्हाचा आनंद तर झुप समाधान मिळाल... वाटल हे सगळ आपल्या कोणाला तरी सांगाव .. ऐइची आठवण आली.. पण तिथ पर्यत फोनही पोहचत नाही... पण तरी तिच्या पर्यत ही गोष्ट पोहचली असावी... पण हात आपसुक मोबाईल कडे वळला.. त्यांना फोन करावा नाही नको समस पाठवावा.. हो नाही म्हणता म्हणता smsपाठवला काही उत्तर नव्हत.. आता या वेळेस खुप गरज होती त्यांच्या नुसत्या उत्तराची नव्हे तर त्यांच्या सोबतीची.. दुसर्‍यादिवशी उत्तर मिळाल.. त्यांनाही खुप आनंद झाला होता म्हणे.. पण .. असो त्यातच समाधान वाटुन घ्याव नाही का? माणसाच दुःख sमस करायला कोणी असो वा नसो निदान सुखात तरी कोणीतरी असावच नाहितर त्याहुन दुःख कोणतच नाही..असो निदान मी तरी याच्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतेय.. आणी गाण गुणगुणतेय '' हर पल यहॉ जी भर जियो.. जो है समा कल हो ना हो''

सोमवार, ९ जून, २००८

कोरडा पाऊस...

बाहेर पाऊस पडतोय... पण हा पावसाळा नविन आहे... बिन्धास्त भिरभिर करणार आणी मनोसोक्त पावसात भिजणार माझ मन आताशा पावसाने आनंदुन जात पण इतक नाही... नाहितर पाऊस आणी मी.. कुठल्याच पावसाचा कंटाळा यायचा नाही मला पहिल्या पवसा इतकाच आनंद प्रत्येक पावसात असायचा... पण आजचा.. पाऊस ओळखिचा आणी आपलासा वाटत नाही.. आधी पावसात भिजताना माझ्यातल्या मलाच मी भेटतेय अस वाटायच पण आता...?? कोणास ठाऊक काय बादललय ते? इतरांच्या मते हा फक्त माझ्या मनाचा खेळ... पण.. असो...आता पावसात भिजते.. पण मला मी नाही भेटत भिजताना... आनंद मिळतो नाही अस नाही.. पण चिरंतर नसतो तो... मी मझ्या पावसाला शोधतेय.. ह्या पावसाच स्वागत करता करता.. कोणास ठाऊक हा पाऊस भिजवत असुनही कोरडाच भासतो..

मंगळवार, २२ एप्रिल, २००८

आठवण छळते...मग कुणाचीही असो...कुणाचीही? कुणाचीही...कुणा आपल्या म्हणविणार्‍या म्हणणार्‍या कुणाचीही.... कधीतरी गुलजारजींच्या ओळी आठवतात... तेरे उतारे हुवे दिन टंगे है लॉन में अब तक.... वा क्या बात है.... गुलजारजी त्या आठवणींना सुंदर करतात आणी तरी घायाळ...पण इतक कोण का आठवाव? त्या मुळे त्रास होतोय फ्क्त...ती तशीच जास्त आठवतेय... आणी ती आठवण आतुन मला जाळतेय... तिचा तो काही तासांचा अस्वस्थपणा गेल वर्षभर मला अस्वस्थ करतोय... ती शांत निजली पण मी अजुनही रात्री जागवतेय... जाग..याला नेमक जागही म्हणता येत नाही... http://www.youtube.com/watch?v=j-ltEkrbDN4&eurl=http://www.orkut.com/FavoriteVideos.aspx?uid=8779623298749326985 एक रानफुल

गुरुवार, १७ एप्रिल, २००८

असंबध..पण...

माझ्या आयुष्यातली काही फुल... काही मोगरा जाई जुई जास्वंद चाफा कमळं गुलाब तशीच नाती आई॥भाऊ बहिण.. मावश्या मामा..मित्र मैत्रिणी.. फुलच नव्हे का ही? या फुलांना नाव आहे इतकच... कोण देत हो ही नाव? समाज..? रुढींनी चालत आलेलि ही नात्यांची नाव... पण शब्दांच्या कुठल्याच कोशात न बसणार नात त्याला काय म्हणायच? का तेही रानफुला सारखच?मी अश्याच एका नात्याला नाव दिलं... पण लोकांना ते नातच समजत नाही.. समजावा हा हट्टही नसतोच पण.. त्या नात्याला दुसर्‍या कुठल्याच नात्याने संबोधल्याच खपत मात्र नाही... का आपण फ़्रेम करुन ठेवली आहे प्रत्येक गोष्ट? कुठल्याही सीमा न ओलांडता क्षितिजा बाहेर वाहणार्‍या नद्या या निर्मळच ना? मग भावनांना का अशी कड्या कुलप लावल्या सारख डांबुन ठेवायच? हं अस नसतच कदाचित... इथे आहेत ती नाती निभावता येत नाहीत... डोळ्या समोरची नाती दिसत नाहीत.. यांची नजर क्षितिजा पल्याड कुठुन जाणार? पण मग ज्यांच्या जातात त्यांना अस बोचर्‍या नजरांनी आणी शब्दांनी का ओरबाडुन काढायचं? जगु द्या त्या रानफुलाला टिच भर मातीत उगवत ते बिचारं...वाहु दे की त्या नदीला स्वछंदी पणे... क्षितिजापल्याड... कुणास ठाऊक जगण्याचा अर्थ याच्यातच दडलेला असावा... मी एक रानफुल..