सोमवार, १२ जानेवारी, २००९

कोष.. मुक्ती.. ती

मला आठवतेय ती..काही वर्षापुर्वी एका वादळाने तिला उद्धस्त करुन टाकल होत... नेहमि हसणारी .. बोलुन बोलुन समोरच्याचे कान किटवणारी ती स्तब्ध झाली होती.. कुठल्याश्या कोशात गुरफ़टवुन टकल होत तिने स्वतःला.. पण मग हळुहळुतिनेच प्रयत्नांनी स्वतःला त्या कोशातून बाहेर्त काढल होत... आता ती चाच्पडत शोधत हस्सत.. शिकत होती परत जगायला... नंतर बरिचशी वादळं आली लहान मोठी... तिने प्रयत्नाने जगण्याचा मुक्त जगण्याचा प्रयत्न केला.. आता परत एक नविन वादळ आलयं.. या वादळाची त्रिव्रता कमी आहे पन तरीही ती परत कोशात चाललिये... प्रयत्न करतेय नाही जाण्याचा.. ओढतेय मागे स्वतःला पण... तितक्याच वेगाने आत चालली आहे.. आता तर ते प्रयत्न करण्याची शक्तीच गळुन पडलीये अस वाटतय...परत कोष..पण आता त्या कोषातून ती बाहेर पडेल की नाही ही केवळ शंकाच.. देव करो ती आता कायमचीच मुक्त होउ देत .. मुक्त कायमचीच मुक्त...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: