मंगळवार, ३१ मार्च, २००९

छळ

काहीतरी चुकतयं... सगळ कळुन मनाला वळत मात्र काहीच नाही.. त्यासाठी त्याला ओरडतेय.. समजावतेय... पण ऐकतच नाही ते... हिरमुसतय.. रडतयं.. कोणी तरी सांगा रे त्याला हताश होउन म्हणते तेव्हा परत उत्तर देणार कोणीच नसत.. उरते ती परत परत किंचाळणारी शांतता.. नेमक काय हवय तुला? डबडबलेल्या डोळ्यांसकट विचारत होते मी.. उत्तरादाखल फक्त हुंदकेच ऐकु आले... किंचाळणारी शांतता आता भंग तर पावली.. वटल काहीतरी हलक होईल पण छे.. झाला तो त्रासच.. आता सगळच अनोळखी वाटत होत.. कोणिच कोनाला ओलख देत नव्हत... प्रत्येक वेळी प्रश्नाची उत्तर शोधायचा हट्ट असतो आपला... पण काही उत्तर त्या प्रश्नांपेक्षा जास्त अस्वस्थ करणारी असतात.. कदचित ते अंतीम सत्य असत म्हणुन जास्त छळणारी.. ती बदलता येत नाही याची हळहळ सांगणारी उत्तरं... सगळ कळुन वळत नाही म्हटल्यावर मनाला काय म्हणायच पळपुट.. का निर्लज्ज? क सत्य ऐकण्याची तकद नसलेल कमकुवत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: