सोमवार, २ फेब्रुवारी, २००९

वायफळ बडबड

आजकल (?) मला तोंड जरा जास्तच फुटलय... म्हणजे इतकी बडबड असते.. की इतर कोणालाच बोलण्याची सोय नाही (तशी ती एरवीही नसतेच म्हणा) त्यात कॉलेज मध्ये वर्गात .. माझे प्रोफेसर कमी आणि मीच जास्त बोलत असते.. आणि तेहि डायरेक्ट त्यांच्याशीच.. काल तर मी उच्चांक गाठला होता.. वर्गात इतर जणं मला खूप शिव्या घलत असतील अर्थात मनातल्या मनात... इतके प्रश्न.. इतके प्रश्न.. की आमच्या सरांनाही मस्त शिकवण्याचा उत्साह संचारतो.. आणि ते उचकतात.. नी लेक्चर अजून लांबत.. तस वर्गात मी नसले तर लेक्चरस् वेळेवर सुटत .. पण मला माझच आश्चर्य वाटल..परवा रात्री ३.३० लाझोपले होते.. ५.३० उठले होते.. शीवाय ऑफिस्मद्येही खुप काम केल होत.. २ दिवस थंदी तापामुळे वीकनेस आलाहोता आणी तरीही इतकी बडबडा????हे हे हे.. ग्रेSSटच .. ही सगळी वायफळ बदबद इथे का अस वाटत असेल ना तुम्हाला पण असच... आधीच म्हणाले होती आजकाल मला तोंड जरा जास्तच फुटलय...

1 टिप्पणी:

Maithili म्हणाले...

too good. mala pahilyandach milala ha blog. chhan aahe.