सोमवार, २१ जुलै, २००८

एक स्वप्न

देव कधी कधी खुप परिक्षा घेतो नाही?एका हाताने आनंद देतो.. आपण त्यात जगायला लागलो की तो आनंद निसटुन जातो.. मी प्रत्येक वेळी मनाला समजावते.. याच्यातही काही चांगल दडल आहे.. कोणास ठाऊक पुढे याहुन चांगल वाढल आहे.. मनही ऐकत माझ.. अश्या वेळी हट्टीपणा सोडुन शहाण्या मुलासारख वागत..आता मी आणी माझ मन वाट बघतोय.. काहीतरी चांगल होण्याची.. यावेळेस हातातुन काही निसटायला नकोय.. या वेळेस एक स्वप्न पुर्ण होणार आहे कदाचित.. कदाचित नाही नक्की.. हे खुप स्पेशल आहे कारण ते मी माझ्यासाठी बघितलेल आहेच पण माझ्यासाठी आणी कोणीतरी बघितलेल अस एकमेव स्वप्न आहे.. प्रयत्न चालु आहे.. जे निसटुन गेल ते याच करिता असाव ...

सोमवार, १४ जुलै, २००८

एक गोड आठवण

अशीच एक आठवण... माझी अन् माझ्या बाबांची आठवण... आम्ही अस्वाद मध्ये गेलो होतो (दादरच हॉटेल).. बाबांन पियुश प्यायच होत... मी विचारल (बाबांसमोर माझ्या मेंदुच वय खरोखरच कमी व्ह्यायच बहुतेक) मी : बाबा.. पियुष नेमक कशापासुन बनवितात? बाबा: अग श्रिखंडाच रिकाम पातेल असत ना? त्याला थोड श्रिखंड उरलेल असत.. ते पावसाच्या पाण्यत ठेवायच... उरत ते पियुष.. मी : (मुर्खा सारखी) पण यांना दरवेळेस कस काय पावसाच पाणी मिळत? बाबा : अगं (इथे मी एकदम सिरियसली ऐकत होते) ते काय करतात माहितेय? श्रिखंडाच भांड नळा खाली ठेवतात... आणि नळा खाली चाळणी धरतात.. झाल...(एक कटाक्ष टाकुन...) डम्बो. मी: ....... :) खरच काही गोड आठवणी हसवत हसवत डोळ्यांच्या कडा नकळत भिजवतात ना?

मंगळवार, ८ जुलै, २००८

:)

लाड...लाड कोणाला नाही आवडत... तस म्हणायला गेल तर मी तर मस्त लाडात वाढली आहे... पण आता लाड आणी मनाचे हट्ट पुरवायला कोणीच नाही :( नो वरीज... मी आहे ना खुद्द मी... स्वतःचे लाड स्वतः पुरवायला... मनाचे हट्ट स्वतःच ऐकुन घ्यायचे.. मनाला काय हवय काय नको सगळ स्वतःलाच सांगायच... ऐकायला विचीत्र वाटतय ना... पण मी खुप एन्जॉय करतेय...मला ना एकदम माझी मीच आई झाल्या सारख वाटतय... लाड पुरवणारी.. हट्ट ऐकणारी.. मनाला धाक धाकवणारी माझी मीच आई... :)सॉली SSSS ड आईडिया ना.... :)ही पिटुकली पोस्ट पण लाडच आहेत माझेच मी पुरवलेले..